पुढारी वृत्तसेवा
विविध मसाले घालून तयार केलेला चहा अनेकांना ठाऊक आहे. पण, अशी कॉफीही असू शकते याची आपण कल्पनाही करीत नाही.
मात्र अशीच ‘सुक्कू कॉफी’ सध्या चर्चेत आहे. ही कॉफी आले, धणे आणि गूळ वापरून तयार केली जाते.
सुक्कू कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. सुक्कू कॉफी आतड्यांचे आरोग्य सुधारते.
गॅस, अपचन किंवा पोटात जडपणा यांसारख्या पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सुक्कू कॉफीचे सेवन केले जाऊ शकते.
सुक्कू कॉफीमध्ये असलेले घटक केवळ हाडांसाठीच नाही तर स्नायूंसाठी देखील फायदेशीर ठरू शकतात.
सांधेदुखी किंवा स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी सुक्कू कॉफी गुणकारी आहे. सुक्कू कॉफी हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही गुणकारी आहे.
रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी लवकर सुक्कू कॉफी पिऊन दिवसाची सुरुवात करता येते.
शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी सुक्कू कॉफीचा आहार योजनेत समावेश केला जाऊ शकतो.