Sugarcane Juice: मधुमेहाच्या रुग्णांनी उसाचा रस प्यावा का? जाणून घ्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

कडक उन्हात उसाचा रस माणसाला एकदम फ्रेश करतो.

इतर कोल्ड्रींक्सपेक्षा उसाचा रस नैसर्गिक तर आहेच, पण स्वस्तही. सहज उपलब्ध आणि चविष्टही. या रसाचे आरोग्यावर काही फायदे तसेच काही तोटेही आहेत.

फायदे

शरीराला त्वरित ऊर्जा देतो.

उष्णतेत थंडावा देतो.

लघवी साफ होण्यास मदत.

पित्तशामक व तृष्णानाशक.

उष्माघातापासून संरक्षण.

डिहायड्रेशन टाळता येते.

शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत.

María del Mar López

लिव्हरसाठी फायदेशीर.

पचनसंस्था सुधारते.

बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत.

त्वचा तजेलदार राहते.

तोटे / काळजी

मधुमेह असणाऱ्यांनी टाळावा किंवा मर्यादित घ्यावा.

अस्वच्छ ठिकाणचा रस घेतल्यास संसर्ग, पोटदुखी होऊ शकते.

जास्त प्रमाणात घेतल्यास साखरेचे प्रमाण वाढते.

दूषित पाणी किंवा बर्फ वापरल्यास अतिसार, उलटी यांसारख्या समस्या.

जास्त पिल्यास कॅलरीज वाढतात. त्यामुळं वजन वाढते.

ताजा असतानाच प्या. जास्त वेळ ठेवल्यास तो आरोग्यास अपायकारक.

"मर्यादित प्रमाणात, स्वच्छ ऊसाचा रस आरोग्यास हितकर आहे. उष्ण प्रकृती, पित्तविकार, उन्हाळ्यात अतिशय हितकर; पण कफ प्रकृती व मधुमेहींनी मर्यादित घ्यावा."

- डॉ. विश्वजित मेहेत्रे, प्राचार्य, आयुर्वेदिक कॉलेज, सांगली