Sugar Cravings : तुम्हालाही जेवल्यानंतर गोड खावेसे वाटते का? शरीर काय संकेत देत असते

पुढारी वृत्तसेवा

जेवण झाल्यानंतर लगेच काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होणे (ज्याला 'Sugar Cravings' म्हणतात) ही खूप सामान्य गोष्ट आहे.

पण शरीर असं का करतं? यामागे काही विशिष्ट शारीरिक आणि मानसिक संकेत लपलेले असतात.जाणून घेवूया यामागचं विज्ञान.

जर तुम्ही जेवणात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स (भात, चपाती) खाल्ले असतील, तर इन्सुलिन अचानक वाढते आणि नंतर रक्तातील साखर वेगाने कमी होते. यामुळे शरीर लगेच गोड पदार्थांची मागणी करते.

झटपट ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न जड जेवणानंतर अन्न पचवण्यासाठी शरीराला खूप ऊर्जा लागते. अशा वेळी मेंदूला वाटते की त्याला झटपट ऊर्जा हवी आहे, आणि गोड पदार्थ हा ऊर्जेचा सर्वात वेगवान स्त्रोत आहे.

गोड खाल्ल्याने मेंदूत 'सेरोटोनिन' (Serotonin) नावाचे आनंदी हार्मोन रिलीज होते, ज्यामुळे आपल्याला छान वाटते. मानसिक ताण किंवा थकवा असल्यास शरीर या हार्मोनसाठी गोड खाण्याचा संकेत देते.

जर तुमच्या जेवणात पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स, फायबर किंवा हेल्दी फॅट्स नसतील, तर पोट भरल्यासारखे वाटत नाही. असंतुलित जेवणामुळेही तृप्ती मिळत नाही आणि गोड खाण्याची इच्छा होते.

अनेकदा हा शरीराचा संकेत नसून केवळ एक सवय असते. रोज जेवणानंतर गोड खाल्ल्याने मेंदूला तसा पॅटर्न तयार होतो, ज्याला 'कंडिशन्ड रिस्पॉन्स' म्हणतात.

जेवणात प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण वाढवा. जेवल्यानंतर लगेच ब्रश करा किंवा बडीशेप खा. खूपच इच्छा झाल्यास गुळाचा खडा, खजूर किंवा थोडे डार्क चॉकलेट खा.