पुढारी वृत्तसेवा
उत्तम स्मरणशक्तीमुळे परीक्षेत यश तर मिळतेच; पण शिकलेल्या गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात. जाणून घेवूया स्मरणशक्तीत वाढ करणार्या सोप्या टिप्स...
मोठी माहिती एकदम पाठ करण्याऐवजी तिचे लहान भागांमध्ये विभाजन करा. यामुळे मेंदूला ती लक्षात ठेवणे सोपे जाते.
जे शिकत आहात, त्याचे मनात एक स्पष्ट चित्र तयार करा. कल्पनाशक्तीमुळे गोष्टी जास्त काळ लक्षात राहतात.
एकाच दिवशी सर्व वाचण्यापेक्षा, तीच माहिती १ दिवस, ३ दिवस आणि ७ दिवसांच्या अंतराने पुन्हा वाचा. यामुळे ती दीर्घकाळ लक्षात राहील.
काहीतरी नवीन शिकताना, त्याचा तुमच्या जुन्या अनुभवांशी किंवा ज्ञानाशी संबंध जोडा. माहितीचे 'कनेक्शन' लागल्यास ती विसरत नाही.
फक्त पुन्हा पुन्हा वाचण्यापेक्षा, पुस्तक बंद करून तुम्हाला किती आठवतेय हे तपासा. स्वतःला प्रश्न विचारल्याने मेंदू जास्त सक्रिय होतो.
क्लिष्ट माहिती लक्षात ठेवण्यासाठी छोटी नावे, गाणी किंवा यमक (Rhymes) तयार करा.
अभ्यास करताना मोबाईल किंवा इतर विचलित करणाऱ्या गोष्टी बाजूला ठेवा. पूर्ण लक्ष देऊन वाचलेली गोष्ट लवकर लक्षात राहते.
तुम्ही जे शिकला आहात, ते दुसऱ्याला समजावून सांगा. दुसऱ्याला शिकवताना तुमची स्वतःची संकल्पना अधिक स्पष्ट आणि पक्की होते.
कोरडी माहिती लक्षात ठेवण्यापेक्षा तिला एखाद्या कथेचे किंवा भावनेचे स्वरूप द्या. कथा नेहमीच जास्त काळ आठवणीत राहतात.