Shortest Pregnancy Animal : ‘हा’ प्राणी फक्त 11 दिवसांत देतो पिल्लांना जन्म

पुढारी वृत्तसेवा

निसर्गामध्ये प्रजननाचे विविध प्रकार पाहायला मिळतात.

मानवामध्ये गर्भधारणेचा काळ 9 महिन्यांचा असतो. परंतु ऑस्ट्रेलियात आढळणारा स्ट्राईप्ड-फेस्ड डनार्ट हा चिमुकला प्राणी केवळ 11 दिवसांत पिल्लांना जन्म देतो.

हा जगातील सर्वात कमी गर्भधारणा काळ मानला जातो.

दिसायला हा प्राणी अगदी उंदरासारखा दिसतो. याचे वजन साधारणत: 25 ग्रॅम आणि लांबी 8 ते 10 सें.मी. असते.

प्रतिकूल वातावरणात स्वतःची प्रजाती टिकवून ठेवण्यासाठी निसर्गाने दिलेली ही एक सुपरफास्ट यंत्रणा आहे.

जन्मलेली पिल्ले अत्यंत लहान असतात.

कांगारूप्रमाणेच ही पिल्ले आईच्या पिशवीत राहून पुढील 3-4 आठवडे वाढतात.

विज्ञानाच्या दृष्टीने ही निसर्गाची एक अजब किमयाच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.