Strawberry : हिवाळ्यात येणारी लालेलाल स्ट्रॉबेरी रोमन काळापासून आहे ‘व्हिटामिन सी’ चा खजिना!

पुढारी वृत्तसेवा

स्ट्रॉबेरीचे शास्त्रीय नाव Fragaria आहे, ज्याचा अर्थ "सुगंधी" असा होतो. तिच्या गोड सुगंधावरून हे नाव पडले.

रानटी स्ट्रॉबेरी प्राचीन रोमन काळापासून खाल्ली जात होती, तेव्हा ती औषधी फळ म्हणूनही वापरली जाई.

आजची मोठी, रसाळ स्ट्रॉबेरी १८ व्या शतकात फ्रान्समध्ये तयार झाली. उत्तर अमेरिका आणि चिलीतील दोन जातींच्या संकरातून ती निर्माण झाली.

महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरी : महाबळेश्वर-वाई (सातारा) परिसर स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे, तिथली थंड हवा या पिकाला पोषक ठरते.

व्हिटॅमिन C चा खजिना: स्ट्रॉबेरीत व्हिटॅमिन C भरपूर असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

यातील अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यास पूरक आहेत. नियमित सेवनाने रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होऊ शकते.

स्ट्रॉबेरी कमी कॅलरीची आणि फायबरयुक्त असते. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन नियंत्रणात मदत होते

व्हिटॅमिन C त्वचेतील कोलॅजन तयार होण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा तजेलदार राहण्यास हातभार लागतो

स्ट्रॉबेरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही, पण मधुमेहींनी प्रमाणातच खावी

यातील फायबर पचन सुधारण्यास मदत करते. तसेच फोलेट आणि अँटिऑक्सिडंट्स एकूण आरोग्यासाठी चांगले आहेत.