पुढारी वृत्तसेवा
बाजारातून आणलेली फळे ताजी राहावीत म्हणून आपण ती सरळ फ्रीजमध्ये ठेवतो, पण सायन्सनुसार ही सवय प्रत्येक फळासाठी योग्य नाही.
पिकण्याच्या प्रक्रियेवर होतो परिणाम
केळी, आंबा, पपई आणि टोमॅटो यांसारखी फळे झाडावरून काढल्यानंतरही पिकत राहतात. फ्रीजमधील थंड हवेमुळे त्यांची नैसर्गिकरीत्या पिकण्याची प्रक्रिया थांबते.
पोषक तत्वे कमी होतात
संशोधनानुसार, टरबूज आणि खरबूज यांसारखी फळे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्वे वेगाने कमी होतात.
चव आणि पोत बदलतो
सफरचंद किंवा नाशपाती फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवल्यास ते मऊ पडतात आणि त्यांची मूळ चव व कुरकुरीतपणा (Texture) नाहीसा होतो.
बाहेर पिकू द्या, मगच फ्रीजमध्ये ठेवा
जर फळे कच्ची असतील तर आधी ती खोलीच्या तापमानाला (Room Temperature) नीट पिकू द्या, आणि त्यानंतरच ती थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
ही फळे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता
द्राक्षे, स्ट्रॉबेरी, चेरी आणि लिंबूवर्गीय फळे (संत्री, मोसंबी) आणल्याबरोबर फ्रीजमध्ये ठेवली तरी चालतात, कारण ती झाडावरून काढल्यावर पुढे पिकत नाहीत.
कापलेली फळे फ्रीजमध्ये ठेवताना काळजी घ्या
फळ कापल्यानंतर ते कधीही उघडे ठेवू नका. ते एअर-टाईट डब्यात ठेवा आणि २४ तासांच्या आत खा, अन्यथा त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात.
महत्त्वाची हेल्थ टिप
फ्रीजमधील फळे थेट काढून लगेच खाऊ नका. खाण्यापूर्वी ती किमान २० ते ३० मिनिटे बाहेर ठेवा आणि सामान्य तापमानाला (Normal Temperature) आल्यावरच त्याचा आस्वाद घ्या.