स्टिकर लावा अन् वीज मिळवा! काय आहे प्रकार..

पुढारी वृत्तसेवा

स्टिकरसारखे सोलर पॅनल!

सोलर पॅनल म्हणजे जड फ्रेम आणि मोठी रचना, ही कल्पना आता बदलणार आहे. ‘ElectroFlex’ हे अत्यंत पातळ आणि लवचीक सोलर उत्पादन स्टिकरसारखे विविध पृष्ठभागांवर चिकटवता येते.

जाडी अवघी ०.८५ मि.मी.

हे सोलर पॅनल केवळ ०.८५ मि.मी. जाड असून वजनानेही हलके आहे. त्यामुळे पारंपरिक सोलर पॅनलपेक्षा ते अधिक लवचीक ठरते.

पाच लेयरपासून निर्मिती

‘ElectroFlex’मध्ये फ्रंट एनकॅप्सुलंट, सोलर सेल्स, कॉपर बॅकिंग, कम्पोजिट लॅमिनेट आणि रिअर सबस्ट्रेट अशा ५ लेयरचा वापर करण्यात आला आहे.

वाकणाऱ्या पृष्ठभागावरही बसणार

लवचीक रचनेमुळे हे सोलर पॅनल सपाट पृष्ठभागापुरते मर्यादित नाही. वाहनांच्या वळणदार छतांसारख्या पृष्ठभागांवरही त्याचा वापर करता येऊ शकतो.

२४.४% पॉवर कन्व्हर्जन कार्यक्षमता

कंपनीच्या दाव्यानुसार, यामध्ये ‘इंटरडिजिटेटेड बॅक-कॉन्टॅक्ट सेल्स’ तंत्रज्ञान वापरले आहे. यामुळे २४.४ टक्क्यांपर्यंत पॉवर कन्व्हर्जन कार्यक्षमता मिळू शकते.

ट्रकपासून ट्रेनपर्यंत वापर

व्यावसायिक ट्रक्स आणि ट्रेनच्या वळणदार छतांवरही हे पॅनल बसवता येऊ शकते. त्यामुळे वाहनांवरच सौरऊर्जा निर्मिती करण्याची शक्यता वाढते.

Pudhari

ड्रोन, विमान आणि बोटींसाठीही उपयोगी

हलके आणि लवचीक असल्यामुळे ड्रोन, विमानांची रचना, बोटी आणि जहाजांवरही ‘ElectroFlex’चा वापर करता येण्याची शक्यता आहे.

घरांपासून डेटा सेंटरपर्यंत वापर

इमारतींची छते, डेटा सेंटर आणि कृषी क्षेत्रासोबतच घरांमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो. ग्राहकांच्या गरजेनुसार त्याचा आकार आणि रंग बदलण्याची सुविधाही असल्याचा दावा आहे.

फक्त शीट नाही, पूर्ण सेटअप!

कंपनीकडून सोलर शीटसोबत आवश्यक वायरिंग, हार्नेस, इलेक्ट्रिकल सिस्टीम आणि पॉवर-बॅलन्सिंग घटकही उपलब्ध करून दिले जात आहेत. भविष्यात आशियाई बाजारपेठेतही विस्तार करण्याची योजना आहे.