Stick Insect: नराशिवाय पिल्लांना जन्म देतो, वाळलेल्या काडीसारखा दिसणाऱ्या या कीटकाच्या १० आश्चर्यकारक गोष्टी

पुढारी वृत्तसेवा

स्टिक इन्सेक्टचे शरीर झाडाची वाळलेली काडी किंवा फांदी यांच्यासारखे दिसते. त्यामुळे झाडावर बसलेला असताना तो सहज ओळखता येत नाही. हा त्याचा शत्रूंपासून बचाव करण्याचा नैसर्गिक मार्ग आहे.

जवळपास ९ इंच लांबी

काही प्रजातींचे स्टिक इन्सेक्ट ९ इंच म्हणजे लांब वाढतात. त्यांच्या काही प्रजातींची लांबी पायांसह दोन फुटांपेक्षाही जास्त असू शकते. हे जगातील सर्वांत मोठ्या कीटकांपैकी एक मानले जातात.

हा कीटक उडूही शकतो

अनेकांना स्टिक इन्सेक्ट केवळ झाडावर चालणारा कीटक वाटतो. मात्र, काही मोठ्या प्रजातींच्या नरांना पंख असतात. हे नर जोडीदाराचा शोध घेण्यासाठी किंवा धोका जाणवल्यास उडू शकतात. मात्र, सर्वच स्टिक इन्सेक्ट उडू शकत नाहीत.

नराशिवाय स्वतःची पिल्ले जन्माला घालण्याची क्षमता

काही प्रजातींमध्ये मादीला नराशी मिलन न करताही फलित अंडी घालता येतात. या अंड्यांतून जन्माला येणारी पिल्ले आनुवंशिकदृष्ट्या मादीसारखीच असतात. या प्रक्रियेला Parthenogenesis म्हणतात.

कित्येक तास एकाच जागी स्थिर राहतो

एखादा शिकारी प्राणी जवळ आल्यास हा कीटक हालचाल करणे थांबवतो. तो कित्येक तास एकाच जागी स्थिर राहू शकतो.

यांची अंडीही बियांसारखी दिसतात

स्टिक इन्सेक्टची अंडी पाहिल्यानंतर ती एखाद्या झाडाच्या बिया असल्याचा भास होतो. अंड्यांचा आकार आणि रंग बियांसारखा असल्यामुळे शिकारी प्राण्यांना ती सहज ओळखता येत नाहीत.

गरज पडल्यास शत्रूशी लढण्याचीही क्षमता

केवळ लपून राहणे शक्य नसेल, तर हा कीटक शत्रूचा सामना करतो. त्याचे मजबूत पाय आणि पायांवरील टोकदार काटे शत्रूला दूर ठेवण्यासाठी उपयोगी पडतात.

जीव वाचवण्यासाठी स्वतःचा पाय तोडतो

एखाद्या शिकारी प्राण्याने पाय पकडल्यास काही स्टिक इन्सेक्ट स्वतःचा तो पाय सोडून देतात आणि तिथून पळ काढतात.

शास्त्रज्ञांच्या मते, स्टिक इन्सेक्टने सुमारे १२ कोटी वर्षांहून अधिक काळापासून स्वतःला लपवण्यासाठी छद्मावरणाचा वापर केला आहे. म्हणजेच, पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या प्रदीर्घ प्रवासात या कीटकांनी आपली जगण्याची पद्धत टिकवून ठेवली आहे.