पुढारी वृत्तसेवा
श्रीलीला ही एक अमेरिकन-भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम करते.
‘आशिकी ३’ चित्रपटात श्रीलीला झळकणार आहे.
तिचा जन्म १४ जून २००१ रोजी अमेरिकेत झाला. तिचे कुटुंब बंगळूर येथे स्थलांतरित झाले आणि तिचे शिक्षण तिथेच झाले.
श्रीलीलाने तिच्या अभिनयाची सुरुवात २०१९ मध्ये कन्नड चित्रपट 'Kiss' मधून केली.
हा चित्रपट यशस्वी ठरला आणि तिला 'साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड' मिळाला.
तिने २०२१ मध्ये 'Pelli SandaD' या तेलुगु चित्रपटातून तेलुगु सिनेसृष्टीत पदार्पण केले.
२०२२ मध्ये तिचा 'Dhamaka' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने तिला तेलुगु चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली.
अभिनयासोबतच ती एक कुशल भरतनाट्यम नृत्यांगना आहे.
अभिनयात येण्यापूर्वी ती वैद्यकीय शिक्षण घेत होती.