Namdev Gharal
उन्हाळा सुरु झाला आहे अनेकांना उष्णतेचा त्रास सुरु होतो. यादिवसात शरिराला आतून थंड ठेवणे गरजेचे असते यासाठी साधा सोपा सहज उपलब्ध असलेला पदार्थ म्हणजे मठ्ठा
मठ्ठा हा ताकापासूनच तयार करत असल्यामुळे त्यामधून दही ताकाचे फायदेही आपोआपच मिळतात. त्याचबरोबर त्यात मिसळलेले मसाले आपल्याला अनेक आरोग्याचे फायदेही मिळवून देतात
उन्हामध्ये खूप घाम येतो शरिराचे तापमान वाढलेले असते परिणामी शरिरात थकवा जाणवतो, तूम्ही एक ग्लास मठ्ठा घेतल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि तुम्हाला ताजेतवाने वाटते.
मठ्ठ्यामध्ये प्रोबायोटिक्स (Probiotics) असतात, जे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करतात. त्यात असलेले जिरं आणि आलं पचन क्रिया सुलभ करतात आणि अपचनाचा त्रास दूर करतात.
तेलकट तुपकट खाल्यास उन्हाळ्यात अनेकदा जळजळ होते. त्यामुळे एक ग्लास मठ्ठा प्यायल्यास छातीतील जळजळ तात्काळ कमी होते.
घामावाटे शरीरातील पाणी आणि क्षार बाहेर जातात. मठ्ठ्यामध्ये पाणी, मीठ आणि जीवनसत्त्वे मुबलक असतात, जे शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतात.
मठ्ठा तयार करताना त्यामध्ये साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करा. सैंधव पचनासाठी अतिशय उत्तम असते
यामध्ये वापरलेले भाजलेले जिरे पचन सुधारते आणि गॅसची समस्या दूर करते. तसेच यात थोडीशी मिरी पूड वापरली तर ती घशातील खवखव कमी करते
खिसलेले आल्ल्ं , कोथिंबिर, कडीपत्ता हे पदार्थ तुम्हाला कफ किंवा सर्दीच्या त्रासापासून आराम देतात. चव वाढवण्यासाठी आणि अँटी-ऑक्सिडंट्ससाठीही हे पदार्थ उपयुक्त असतात.
मठ्ठ्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि त्यातील घटक शरीरातील 'फॅट्स' जाळण्यास मदत करतात. डाएट करणाऱ्यांसाठी हे एक उत्तम 'हेल्दी ड्रिंक' आहे.