Namdev Gharal
प्रत्येक सजीवाची मुलभूत गरजच आहे, साधारणपणे शरीर आडवे करुन किंवा पसरून सजीव झोपतात पण स्पर्म व्हेल हा समुद्रात राहणारा प्रचंड मोठा सस्तन प्राणी अगदी पाण्यात उभे राहून झोपतात
इतर प्राण्यांप्रमाणे स्पर्म व्हेल आडवे झोपत नाहीत. ते पाण्याच्या पृष्ठभागाखाली डोकं वर आणि शेपूट खाली करून सरळ रेषेत उभे राहून झोपतात.
समुद्रातील महाकाय खांब : झोपताना हे व्हेल पाण्यात एखाद्या तरंगणाऱ्या महाकाय लाकडी ओंडक्यासारखे किंवा खांबासारखे शांत उभे दिसतात. कारण यांची लांबी ५० फूट तर वजन ३५ ते ४० टनांपर्यंत इतके विशाल असते
अजून एक रंजक गोष्ट म्हणजे स्पर्म व्हेल कधीही एकटे झोपत नाहीत. सुरक्षेसाठी संपूर्ण कळप एकत्र येऊन एकाच वेळी, एकमेकांच्या शेजारी उभे राहून झोप घेतो.
'पॉवर नॅप': सस्तन प्राण्यांमध्ये हे सर्वात कमी झोपणारे प्राणी आहेत. ते एका वेळी फक्त १० ते १५ मिनिटे झोपतात. संपूर्ण दिवसातील केवळ ७ टक्के वेळ ते झोपेसाठी देतात
इतर डॉल्फिनप्रमाणे यांचा अर्धा मेंदू जागा राहत नाही. स्पर्म व्हेल दोन्ही मेंदू बंद करून इतकी गाढ झोप घेतात की जवळून बोट गेली तरी त्यांना जाग येत नाही.
स्पर्म व्हेलच्या डोक्यात 'स्पर्मासेटी' (Spermaceti) नावाचे हलके तेल असते. ते पाण्यापेक्षा हलके असल्याने व्हेलचे डोकं आपोआप वरच्या दिशेने तरंगत राहते.
२००८ मध्ये शास्त्रज्ञांची बोट शांत उभ्या असलेल्या व्हेलच्या कळपाला धडकली, तेव्हाच हे महाकाय जीव झोपले होते हे जगासमोर आले
पाण्यात जरी हा महाकाय जीव राहत असला तरी याच्याही शरीराला विश्रांतीची गरज असते. पाण्यासारख्या अस्थिर ठिकाणी व्हेल माश्यांची ही झोपण्याची पद्धत अद्भूत ठरते