Namdev Gharal
बकुळाची फुले व कविता हे मराठीतील खूप जुने समिकरण आहे याची चांदण्यासारखी लहान लहान फुलांवरुन अनेक कवींनी खुप सुंदर कविता रचल्या आहेत.
पण बकुळाचे झाड मानवी आरोग्यासाठी बहुमोल आहे, आयुर्वेदामध्ये बकुळीच्या झाडाची साल, फुले, पाने, फळे आणि बियांचा वापर विविध विकारांवर केला जातो:
बकुळीची साल तुरट असते. ही साल पाण्यात उकळून त्याचा काढा करून गुळण्या केल्यास हलणारे दात घट्ट होतात, हिरड्यांमधून येणारे रक्त थांबते आणि मुखदुर्गंधी दूर होते.
बकुळीच्या वाळलेल्या फुलांचा वास घेतल्याने किंवा फुलांचे चूर्ण नाकात हुंगल्याने जुनाट डोकेदुखी, सर्दी आणि अर्धशिशीमध्ये आराम मिळतो.
फुलांचा मंद सुवास डोकेदुखी आणि मानसिक ताण व मनाला शांत करून मानसिक थकवा कमी करतो.
कच्ची फळे व सालीचा काढा पचनास मदत करतो आणि जुलाब नियंत्रित करण्यासाठी गुणकारी ठरतो.
बकुळीची साल ही ॲन्टिसेफ्टीक असतात, सालीच्या काढ्याने जखम धुतल्यास जखम लवकर भरून येते आणि जंतुसंसर्ग टळतो.
बकुळीच्या ताज्या फुलांपासून सुगंधी तेल आणि अत्तर बनवले जाते. वाळलेली फुले कपड्यांच्या कपाटात किंवा घरात ठेवल्यास नैसर्गिक रूम फ्रेशनरसारखा सुगंध दरवळतो.
सदाहरित पर्णसंभारामुळे मंदिर परिसर, उद्याने, रस्त्यांच्या दुतर्फा आणि घराच्या आवारात सावलीसाठी बकुळीचे झाड मोठ्या प्रमाणावर लावले जाते.
याचे लाकूड अतिशय कठीण, जड आणि टिकाऊ असते. त्यामुळे स्थानिक पातळीवर घरांचे खांब, शेतीची अवजारे आणि लाकडी कोरीव कामांसाठी याचा वापर केला जातो.