पुढारी वृत्तसेवा
सोयाबिन हा शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनची गरज भागवण्याचा सर्वोतम पर्याय मानला जातो. प्रोटीनची गरज भागवण्यासाठी आणि मांसाहाराला तोडीस तोड असतो
आज पाहू सोया चंक्स दररोज खाल्यानंतर शरीराला कोणते फायदे मिळू शकतात , १०० ग्रॅम सायाबिनमध्ये ५२% प्रोटीन असते
शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा राजा! शाकाहारी आहारात अनेकदा प्रोटीन कमी पडते. पण सोया चंक्स हा प्रथिनांचा सर्वात स्वस्त आणि श्रीमंत स्त्रोत आहे.
१०० ग्रॅम चिकनमध्ये साधारण २५ ग्रॅम प्रोटीन असते, तर १०० ग्रॅम कच्च्या सोया चंक्समध्ये तब्बल ५२ ग्रॅम प्रोटीन असते!
मांसाहाराला खरा पर्याय ठरू शकतो? तर होय सोया चंक्स हे Complete Protein आहे. यामध्ये शरीराला आवश्यक असणारे सर्व ९ अमिनो ॲसिड्स मिळतात, जे सहसा मांसाहारात असतात.
जर तुम्ही वर्कआउट करत असाल आणि मसल्स बनवायचे असतील, तर महागड्या प्रोटीन पावडरऐवजी सोया चंक्स हा एक उत्तम नॅचरल पर्याय आहे.
सोया चंक्समध्ये फॅट (चरबी) नगण्य असते आणि फायबर जास्त असते. यामुळे पोट भरलेले राहते आणि वजन वेगाने कमी होते.
मांसाहारामुळे शरीरात सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकते, पण सोया चंक्समध्ये कोलेस्ट्रॉल नसते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते
जरी हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत असला तरी याचे योग्य प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. शरीराला फायदा मिळवण्यासाठी दिवसाला २५ ते ३० ग्रॅम सोया चंक्स खाणे पुरेसे आणि सुरक्षित आहे
ज्यांना थायरॉईड (Thyroid) चा त्रास आहे किंवा सोया पदार्थांची ॲलर्जी आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे