Namdev Gharal
दक्षिण भारतात प्रामुख्याने कोणतेही अन्न हे वाढताना केळीच्या पानाचा हमखास वापर केला जातो
ही प्रथा खूप वर्षापासून चालत आलेली आहे मंदिरातील प्रसाद, सण-समारंभ, विवाहसोहळे यात केळीचे पान शुभ मानले जाते.
पण केळीच्या पानावर जेवण करणे हे अतिशय आरोग्यदायी सवय आहे. वैद्यानिकदृष्ट्याही याचे शरिराला खूप फायदे आहेत.
केळीच्या पानात पॉलीफिनॉल्स नावाचे अँटीऑक्सिडंट असतात गरम पदार्थ वाढल्यावर हे थोड्या प्रमाणात अन्नात मिसळतात. यामुळे पेशींचे संरक्षण, रोगप्रतिकारक शक्ती वाढणे हे फायदे मिळतात
आर्युवेदानुसार पानावर असलेली नैसर्गिक मेणासारखी लेयर गरम अन्नामुळे वितळते.ती अन्नात मिसळल्याने पचनशक्ती सुधारते.
पानातून निघणारा हलका सुगंध, वाफेने येणारा नैसर्गिक फ्लेवर अन्नाची चव वाढवतो. विशेषतः सांबार-रसम, तुप-भात, इडली-वडा याची चव अधिक वाढते
केळीच्या पानात नैसर्गिक antibacterial गुणधर्म आहेत. यामुळे पान स्वच्छ ठेवल्यास जिवाणूंची वाढ होण्याची शक्यता कमी होते.
केळीच्या पानावरी मेणासारखी लेयर फॅटचे शोषण्याचे काम कमी करते त्यामुळे तेलकट पदार्थ खाल्ले तरी शरीरात जडपणा कमी वाटतो.
या पानामध्ये पॉलीफिनॉल्स, फ्लॅवोनॉइड्स ही वनस्पतीजन्य सूक्ष्म खनिजे आढळतात ही शरीरासाठी चांगली मानली जातात. गरम जेवण वाढल्यावर ती जेवणात मिसळतात
या पानावर जेवण्याने मानसिक आनंद मिळतो. तसेच हे पर्यावरणासाठी अतिशय अनुकूल पद्धत आहे विषेशता प्लास्टिकला योग्य पर्याय