पुढारी वृत्तसेवा
तेलुगू चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री रितिका नायक, तिच्या खास अंदाजाने पुन्हा एकदा चर्चेत आहे.
नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर लाल साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती खूपच आकर्षक आणि पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे.
साडीसोबत तिने हेवी झुमके आणि ब्रेसलेट घातले आहे.
रितिकाने अशोक वनमलो अर्जुन कल्याणम या चित्रपटातून पदार्पण केले आणि वसुधाची भूमिका साकारली.
तिचा जन्म १९९७ मध्ये दिल्ली येथे झाला.
तिचा अलीकडील चित्रपट 'मिराई' आहे, ज्यात तिने विभा ही मुख्य भूमिका साकारली आहे.
ती बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा यांना आपली प्रेरणा मानते.
तिचे आगामी चित्रपट 'डुएट' आणि 'VT15' आहेत.