पुढारी वृत्तसेवा
नात्यांमध्ये 'सॉरी' हा शब्द एकीकडे जणू संजीवनी असतो, तर दुसरीकडे तोच शब्द नात्याचा आधार कमकुवत करू शकतो.
अनेकदा लोक छोट्या-छोट्या गोष्टींसाठी इतकी माफी मागतात की, या शब्दाची किंमतच कमी होते.
तज्ज्ञांच्या मते, माफी मागण्यामागे विनम्रता असावी, लाचारी नाही.
कधी 'माफ करा' बोलल्याने तुमचा मान वाढतो, तर कधी विनाकारण माफी मागितल्याने तुम्ही स्वतःची किंमत कमी करून घेता, जाणून घ्या.
खोटे बोलणे (सत्य उघड झाल्यावर)
यामुळे तुटलेला विश्वास पुन्हा जोडला जातो.
अपमानास्पद किंवा रुक्ष बोलणे
रागाच्या भरात मन दुखावले असल्यास, त्वरित सॉरी म्हणावे.
महत्त्वाची वचने तोडणे
दिलेला शब्द पाळला नाही तर दुःख होते, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करा.
भावनांकडे दुर्लक्ष करणे
तुमची इच्छा नसतानाही समोरच्याला वाईट वाटल्यास, नातं जपण्यासाठी सॉरी आवश्यक आहे.
गरजेच्या वेळी मदत न करू शकणे
अडचणीत सोबत न राहिल्यास त्यांच्या मनाला आधार देण्यासाठी माफी मागा.
संशयामुळे फोन तपासणे
विश्वासघात केल्यासारखं वाटू शकतं, म्हणून स्पष्टीकरण देऊन माफी मागणे योग्य.
सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे
विनोदात किंवा रागातही दुसऱ्यांसमोर अपमान केल्यास सॉरी बोलणे खूप महत्त्वाचे आहे.
मोठ्या निर्णयांत त्यांना विचार न घेणे
मोठे निर्णय एकट्याने घेतल्यास त्यांना दुखावलं जाऊ शकतं, म्हणून माफी मागून चर्चा करा.
माफ केलेल्या जुन्या गोष्टी पुन्हा काढणे
जुन्या गोष्टी पुन्हा-पुन्हा आठवण करून देणे नात्याला विषारी बनवते.
स्वतःच्या भावना दडवून ठेवणे
मनातलं बोलून मोकळं न झाल्यास दुरावा वाढतो; गरज पडल्यास सॉरी म्हणून संवाद साधा.