Namdev Gharal
कोकणातील एक लोकप्रिय पेय म्हणजे सोलकढी, माशाच्या जेवणाबरोबर सोलकढी निश्चित असतेच
सोलकढी चवीला अतिशय युनिक असतेच पण उन्हाळ्यात तिचे सेवन अतिशय फायदेशिर ठरते, हे एक आरोग्यदायी पेय आहे
सोलकढी मध्ये आमसूल किंवा कोकम हा प्रमुख घटक हा थंड प्रकृतीचा असतो. त्यामुळे सोलकढी उष्णतेमुळे होणारा शरिराचा दाह कमी करते
सोलकढी तयार करताना जिरे, ओवा, आले, लसूण हे पदार्थ पचनासाठी उत्तम असतात. त्यामुळे पाचनशक्ती सुधारण्यासाठी सोलकढी उपयुक्त ठरते
उन्हाळ्यात अनेकदा भूक मंदावते किंवा अन्नाचे पचन नीट होत नाही, अशा वेळी सोलकढी प्यायल्याने अपचन आणि गॅसचा त्रास कमी होतो.
ज्यांना वारंवार पित्ताचा त्रास होतो, त्यांच्यासाठी सोलकढी हे 'अमृत' मानले जाते. कोकम आणि नारळाचे दूध पित्त शांत करण्यास मदत करतात.
वांरवार घामामुळे उन्हाळ्यात शरीर डी हायड्रेट होत असते,सोलकढी पिल्यानंतर तुमचे शरीर पुन्हा ऊहायड्रेट राहते शरीराला उर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.
सोलकढीत नारळाचे दुध घातले जाते. या दूधात असलेल्या जीवनसत्त्वामुळे त्वचा तजेलदार राहते. उन्हामुळे येणारी खाज किंवा पुरळ कमी होण्यासही याची मदत होते.
सोलकढी फ्रीजमध्ये ठेवून थंडगार प्यायल्यास जास्त मज्जा येते, पण जर तुम्हाला कफ किंवा सर्दीचा त्रास असेल, तर ती फार थंड न पिता साध्या तापमानाला पिणे चांगले.
दुपारी जेवल्यानंतर किंवा जेवणासोबत एक ग्लास सोलकढी घेतल्यास अतिशय उत्तम, यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते.