Solar System |आपल्या सूर्यमालेतील ग्रहांची नासाने टिपलेली छायाचित्रे पहा!

Namdev Gharal

बुध ग्रहः सूर्याच्या सर्वात जवळचा आणि आकाराने सर्वात लहान असलेला हा ग्रह अतिशय उष्ण आहे  

शुक्रः हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी आणि सर्वात उष्ण ग्रह असून याला 'पहाटेचा तारा' असेही म्हणतात.

पृथ्वीः जीवसृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ज्ञात ग्रह ज्याच्या ७१% भागावर पाणी आहे

मंगळः याला 'लाल ग्रह' म्हटले जाते आणि येथे भविष्यात मानवी वस्ती करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू आहे.

गुरुः हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असून यावर पिढ्यानपिढ्या चालणारी महाकाय वादळे आहेत.

शनीः आपल्या भोवती असलेल्या सुंदर कड्यांमुळे (Rings) हा ग्रह सर्वांचे लक्ष वेधून घेतो

युरेनसः हा एक थंड वायुरूप ग्रह असून तो आपल्या अक्षावर (Axis) एका बाजूला कललेला आहे

नेप्चुनः सूर्यापासून सर्वात लांब असलेला हा निळा ग्रह अत्यंत वेगवान वारे आणि थंडीसाठी ओळखला जातो.

२४ ऑगस्ट २००६ प्लुटो याची ग्रह म्हणून असलेली मान्यता काढून घेण्यात आली. आता याला वायुचा गोळा किवा dwarf planet असे म्हटले जाते