पुढारी वृत्तसेवा
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, सोशल मीडियाचा अतिवापर मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
एका नवीन अभ्यासानुसार, एका आठवड्याचा सोशल मीडिया ब्रेक तरुण प्रौढांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा करतो.
युनायटेड किंगडममधील संशोधकांनी 18 ते 24 वयोगटातील 295 सहभागींचा सात दिवसांसाठी अभ्यास केला.
या 'डिजिटल डिटॉक्स' दरम्यान सहभागींना त्यांचा दररोजचा स्क्रीन टाइम दोन तासांवरून फक्त 30 मिनिटांपर्यंत कमी करण्यास सांगण्यात आले.
सात दिवसांच्या ब्रेकनंतर सहभागींच्या मानसिक आरोग्याच्या लक्षणांमध्ये मोठी सुधारणा दिसून आली.
ब्रेकनंतर, चिंता लक्षणांमध्ये सरासरी 16.1 टक्के घट झाली.
नैराश्याची लक्षणे लक्षणीयरीत्या 24.8 टक्के कमी झाली.
झोपेच्या समस्येमध्ये एकूण 14.5 टक्के सुधारणा झाली.
याशिवाय, सोशल मीडियाचा वापर कमी केल्यानंतरही सहभागींच्या एकटेपणामध्ये कोणताही बदल दिसून आला नाही.
या संशोधनातील तज्ञांनी सांगितले की, 'सोशल मीडिया ब्रेक' हा मानसिक आरोग्याच्या उपचारांसाठी अत्यंत प्रभावी असल्याचे सांगितले आहे.
तज्ञांनी तरुण पिढीला त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी वेळोवेळी अशा 'डिजिटल डिटॉक्स'चा अवलंब करण्याची शिफारस केली आहे.