Namdev Gharal
Snow Monkey ला Japanese Macaque (मॅकॉक) असेही म्हणतात. हे माकड जपानमध्ये आढळणारे एकमेव स्थानिक माकड आहे. आणि हे थंडीपासून वाचण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबते
हे माकड थंड बर्फाळ भागात राहणारे सर्वात उत्तरेकडील माकड आहे. त्यामुळे त्याला “Snow Monkey” असे नाव दिले गेले आहे.
बर्फ पडत असतानाही ही माकडे गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये (Hot Springs) अंघोळ करताना दिसतात — हा त्यांचा थंडीपासून बचावाचा नैसर्गिक मार्ग आहे.
है नैसर्गिक गरम पाण्याचे झरे या माकडांसाठी ‘बाथ टब’ म्हणून काम करतात. बर्फ पडत असताना ही माकडे निवांतपणे यामध्ये डुंबतात
या माकडांची टोळीच या गरम पाण्यामध्ये मस्तपैकी झकुजी बाथ घेत असतात. गरम पाण्यामुळे या माकडांना शरिराचे तापमान योग्य ठेवण्यात मदत होते.
त्यांचा चेहरा आणि मागचा भाग लालसर रंगाचा असतो. या माकडांचे शरीर घट्ट, लांब केसांनी झाकलेले असते, जे त्यांना थंडीपासून संरक्षण देते.
Snow Monkeys अत्यंत सामाजिक प्राणी आहेत. ते मोठ्या गटांमध्ये राहतात, आणि त्या गटांमध्ये female नेतृत्व करतात.
हे माकड अत्यंत बुद्धिमान आहेत उदाहरणार्थ, त्यांनी अन्न (जसे बटाटे) धुवून खाण्याची सवय विकसित केली आहे.
त्यांचा आहार फळे, बिया, पाने, कीटक आणि काही वेळा लहान प्राणी यांवर आधारित असतो.
Snow Monkey हा जपानचा राष्ट्रीय प्राणी मानला जातो, आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारा वन्यजीव आहे.