पुढारी वृत्तसेवा
स्वप्न शास्त्रानुसार, आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नामागे काहीतरी संकेत दडलेला असतो.
काही स्वप्ने भविष्यातील बदलांचा इशारा देतात. यात सापाची स्वप्ने अत्यंत महत्त्वाची मानली जातात. ही स्वप्ने नेमकी काय सुचवतात?
साप चावल्याचे स्वप्न पडणे
स्वप्न शास्त्रानुसार, हे आगामी गंभीर आजाराचे किंवा अचानक येणाऱ्या मोठ्या संकटाचे लक्षण आहे. तसेच, जवळचा व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकतो, असाही याचा अर्थ होतो.
साप मागे लागणे
याचा अर्थ तुम्ही आयुष्यातील एखाद्या तणावापासून पळ काढत आहात. तुम्ही एखाद्या सत्याचा सामना करायला घाबरत आहात.
झाडावरून साप पडणे
हे तुमच्या करिअरसाठी धोक्याची घंटा आहे. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात अचानक काही अडथळे येऊ शकतात. अशा वेळी कामात अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.
अंगाला साप विळखा घालणे
याचा अर्थ असा की, तुम्ही कोर्ट-कचेरीच्या कचाट्यात सापडू शकता किंवा तुमच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहू शकतो. हे स्वप्न बदनामीचे संकेतही देते.
सापाला मारण्याचा प्रयत्न करणे आणि तो सुटणे
असे दिसल्यास तुमच्या अडचणी अजून संपणार नाहीत, असे समजावे. ती समस्या पुन्हा उफाळून वर येऊ शकते आणि तुमची डोकेदुखी वाढवू शकते.
घराच्या उंबरठ्यावर काळा नाग दिसणे
हे कौटुंबिक कलहाचे लक्षण मानले जाते. घरात मोठी भांडणे होऊ शकतात किंवा कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते.