पुढारी वृत्तसेवा
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिने वनडे विश्वचषक स्पर्धेत द. आफ्रिकेविरुद्ध २३ धावांची खेळी करत इतिहास रचला.
स्मृती एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वनडे धावा करणारी महिला फलंदाज ठरली आहे.
तिने ऑस्ट्रेलियाच्या मेलिंडा क्लार्क हिचा विक्रम मोडीत काढला.
क्लार्कने १९९७ मध्ये १६ सामन्यांच्या १४ डावांमध्ये ८०.८३ च्या सरासरीने ९७० धावा केल्या होत्या. यात ३ शतके आणि ४ अर्धशतकांचा समावेश होता.
मानधनाने यावर्षी म्हणजे 2025मध्ये आतापर्यंत १७ डावांमध्ये ९८२ धावा कुटल्या आहेत. यादरम्यान तिने ४ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत.
विशेष म्हणजे, क्लार्क आणि मानधना यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही महिला फलंदाजाने एका कॅलेंडर वर्षात ९०० धावांचा टप्पा ओलांडलेला नाही.
मानधनाने १११ एकदिवसीय सामने खेळले असून, यामध्ये ४८ च्या सरासरीने ४,९०० हून अधिक धावा केल्या आहेत.
तिच्या बॅटमधून १३ शतके आणि ३२ अर्धशतके झळकली आहेत. या फॉर्मेटमधील तिची सर्वोत्तम धावसंख्या १३६ आहे.
ती भारतीय महिला खेळाडूंमध्ये वनडे फॉर्मेटमध्ये दुसरी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. तिच्या पुढे मिताली राज (७,८०५) आहे.