Home Internet Speed Tips: इंटरनेटचा स्पीड घरी स्लो झाल्याने चिडचिड होतेय? वेग वाढवण्यासाठी सोपा उपाय

मोहन कारंडे

घरून काम करताना किंवा चित्रपट पाहताना वाय-फायचा कमी वेग त्रासदायक ठरतो. स्पीड वाढवण्यासाठी राउटर बदलण्याऐवजी 'हे' सोपे उपाय करून पाहा!

यामागे एक साधे कारण असू शकते, ते म्हणजे तुमच्या घरातील इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणेच वाय-फायच्या सिग्नलमध्ये अडथळा आणत आहेत.

टेक तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही वाय-फाय राऊटरला इतर गॅजिटपासून दूर ठेवले, तर तुमच्या इंटरनेट स्पीडमध्ये त्वरित सुधारणा होऊ शकते.

अनेकदा आपण राऊटर अशा वस्तूंच्या जवळ ठेवतो, ज्यामुळे त्याचा परफॉर्मन्स खराब होतो. तज्ज्ञांच्या मते, राऊटरला अलेक्सा किंवा गुगल होम स्पीकरसारख्या ब्लूटूथ उपकरणांपासून दूर ठेवले पाहिजे.

आजकाल ही गॅजेटस् जवळपास प्रत्येक घरात आढळतात, पण त्यांना राऊटरजवळ ठेवल्याने वाय-फाय सिग्नल कमकुवत होऊ शकतो.

ब्लूटूथ उपकरणे (उदा. अलेक्सा, गुगल होम स्पीकर) आणि वाय-फाय राउटर एकाच रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करतात. जवळ ठेवल्यास फ्रिक्वेन्सीमध्ये 'टक्कर' होऊन इंटरनेटचा वेग कमी होतो.

तुम्हाला वेगवान इंटरनेट हवे असेल, तर तुमचा राऊटर ब्लूटूथ उपकरणांपासून थोडा दूर ठेवा.

ब्लूटूथ उपकरणांशिवाय मायक्रोवेव्ह, बेबी मॉनिटर आणि कॉर्डलेस फोनसारखी उपकरणे देखील वाय-फाय वेग कमी करू शकतात. मायक्रोवेव्ह चालू असताना सिग्नलवर मोठा परिणाम होतो.

वाय-फायचा वेग वाढवण्यासाठी राउटरला मायक्रोवेव्ह आणि ब्लूटूथ उपकरणांपासून पुरेसा दूर आणि मोकळ्या जागेत ठेवा.