Sleep Tips: उशीशिवाय झोपणे चांगले की वाईट? डॉक्टर काय सांगतात?

पुढारी वृत्तसेवा

उशीशिवाय झोपण्याची सवय लावून घेतल्यास गाढ आणि शांत झोप लागू शकते. अनेकांसाठी हा बदल आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरतो.

उशीशिवाय झोपण्याचे फायदे

१) उशी न घेता झोपल्यामुळे आपली मान आणि पाठीचा कणा नैसर्गिक स्थितीत राहतो. यामुळे मणक्यावर विनाकारण दबाव येत नाही आणि शरीराचे पोश्चर सुधारते.

10ef13db-1aa6-4865-b1a4-be3da9d9cc03

२) जाड उशी वापरल्याने मानेचे स्नायू ताणले जातात. सपाट पृष्ठभागावर झोपल्याने मानेवरील हा ताण कमी होतो आणि दीर्घकालीन मानदुखीपासून आराम मिळतो.

३) उशी काढून टाकल्याने मानेवरील दबाव आणि तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते. सामान्यतः मानदुखी असलेल्या लोकांना याचा नक्कीच फायदा होतो.

४) ज्यांना पोटावर झोपण्याची सवय आहे, त्यांनी उशी न वापरणेच अधिक हिताचे असते.

५) झोपेच्या चुकीच्या स्थितीमुळे ज्यांना दीर्घकालीन मानेच्या वेदनांची समस्या उद्भवते त्यांना उशी न वापरण्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

उशी शिवाय झोपण्याचे तोटे

१) प्रत्येकासाठीच उशीशिवाय झोपणे फायद्याचे नसते. विशेषतः जे लोक कुशीवर झोपतात, त्यांच्या डोक्याला आणि मणक्याला आधाराची गरज असते.

२) कुशीवर झोपताना उशी नसेल, तर मान आणि खांद्यातील स्नायूंमध्ये कडकपणा येऊ शकतो. यामुळे खांदेदुखीचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते.

३) पोटावर झोपणार्‍यांना उशीशिवाय झोपल्याने फायदा होतो. पाठीवर आणि कुशीवर झोपणार्‍यांना योग्य पाठीचा कणा राखण्यासाठी काही प्रमाणात आधाराची आवश्यकता असते.

४) तज्ज्ञांच्या सल्ल्याने उशी वापरणे किंवा उशीचा वापर हळूहळू टाळणे योग्य राहील.