Mobile | मोबाईल उशाशी घेऊन झोपताय, तर वेळीच सावध व्हा!

पुढारी वृत्तसेवा

आजकाल मोबाईल अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांएवढा महत्‍वाचा झाला आहे. संपर्कासाठी तयार केलेले हे मशीन मानवाच्या जीवनावर हावी झाले आहे.

अनेकांना झोपतान मोबाईल उशाशी ठेऊन झोपायची सवय असते. तसेच रात्री अपरात्री स्क्रिन चेक करण्याची सवय लागलेली असते.

पण तज्ञांच्या मते तुम्हीही असे करत असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण एका या छोट्या कृतीमुळे काय काय होऊ शकते हे पाहुया

पहिले लक्षण तुमची झोपमोड होत असेल, किंवा सकाळी तुम्हाला फ्रेश वाटत नसते तर याला कारणीभूत झोपताना तुमच्या उशाशी ठेवलेला मोबाईल आहे

कारण मोबाईल हे सतत सुरु असणारे यंत्र आहे. तुम्ही स्क्रिन जरी बंद केली तर त्‍याच्या आतील सर्वच यंत्रणा सुरु राहते

दुसरी गोष्ट यातून बॅटरी, रॅम, यातून टिपकल साऊंड क्रिएट होत असतो. जो कानांना ऐकू येऊ शकत नाही पण त्‍याचा थेट संबध आपल्या झोपेशी आहे. त्‍यामुळे झोपमोड होत असते

दुसरी गोष्ट कोणतेही नोटीफिकेशन आले तर. लगेच आपण स्क्रिन लॉक काढून लगेच स्क्रिनकडे पाहतो. अंधाऱ्या खोलीत थेट डोळ्यावर प्रकाश पडतो. हा तुमच्या रेटीनासाठी खूप घातक आहे

दुसरी गोष्ट सायकॉलॉजी आपण बेडवर पडल्यावर झोप येत नाही तोपर्यंत स्क्रोल करत राहतो. यामुळे नकळत तुमची झोप लांबते. हे आरोग्यासाठी हानीकारक आहे

त्‍यामुळे ही सवय लवकारत लवकर सोडा. कारण नवीन रिसर्चनुसार उशाशी मोबाईल ठेवल्याने भविष्यात गंभीर आजाराचाही धोका उद्भवू शकतो.