Sleeping Position Heart Health: सावधान! 'या' कुशीवर झोपणाऱ्या लोकांना येऊ शकतो हार्ट अटॅक!

पुढारी वृत्तसेवा

रात्रीची झोप शरीरासाठी जेवढी महत्त्वाची आहे, तिवढीच महत्त्वाची आहे तुमची 'स्लीपिंग पोझिशन'. चुकीच्या पद्धतीने झोपल्याने हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

pinterest

झोपताना शरीराचा झुकाव आणि श्वास घेण्याची पद्धत यामुळे रक्ताभिसरण आणि हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो. हृदयविकार असलेल्यांसाठी तर योग्य दिशा निवडणे महत्वाचे आहे.

उजव्या बाजूला झोपल्यास फुफ्फुसांचा आणि रक्तवाहिन्यांचा दाब थेट हृदयावर पडतो. यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

हृदय शरीराच्या डाव्या बाजूला असते. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि हृदयावरचा ताण कमी होतो.

file photo

डाव्या बाजूला झोपल्याने अन्न जठरातून सहजपणे आतड्यांकडे सरकते. यामुळे अ‍ॅसिडिटी, जळजळ आणि अपचनासारखे त्रास कमी होतात.

गर्भवती महिलांनी डाव्या कुशीवर झोपल्याने गर्भाला आणि गर्भाशयाला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो, जो बाळाच्या वाढीसाठी उत्तम असतो.

तज्ज्ञांच्या मते, हृदय निरोगी ठेवायचे असेल तर डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासही मदत होते.

जर तुम्हाला आधीच श्वसनाचा त्रास किंवा हृदयविकार असेल, तर झोपण्याची पद्धत बदलण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण आवश्यक.