Sleeping animal | हे आहेत दिवसातील सर्वाधिक वेळ झोप काढणारे प्राणी!

Namdev Gharal

कोणत्‍याही सजीवाला झोप ही खूप महत्‍वाची असते, प्राण्यांमध्ये उर्जा वाचवणे, स्वास्थ्य, यासाठी खूप उपयुक्त ठरते. असे काही प्राणी पाहू की दिवसाच्या २४ तासात अनेक तास झोपूनच काढतात.

यामध्ये मांजर येथे ९ व्या स्थानी, घरात पाळीव मांजर आपण पाहतो की बराचवेळ झोपलेले आढळते. हे दिवसातून १२ ते १४ तास झोपेत घालवते.

squirrel झाडावरुन उड्या मारणारी खारुताई खूप उर्जा खर्च करत असते यामुळे ती १४ ते १५ तास दिवसातून झोप घेते

त्‍यांनतर येतो जंगलातील सर्वात ताकदवर शिकारी प्राणी वाघ, मार्जार कुळातील हा प्राणी आपल्या वजनापेक्षा मोठी शिकार सहज करतो. म्हणून उर्जा वाचवण्यासाठी वाघ १६ ते १८ तास झोपेत घालवतो

त्‍यानंतर आणखी एक आफ्रीका खंडात व भारतात आढळणारा शिकारी प्राणी म्हणजे सिंह, हा मोठा शिकारी दिवसातील १६ ते २० तास वेळ झोपण्यात घालवतो.

Owl Monkey ओऊल मंकी हे माकड दिवसातून १७ ते १८ तास सलग झोपते, दक्षिण अमेरिकेत आढळणारे एकमेव निशाचर माकड आहे. त्यांना घुबडासारखे मोठे डोळे असतात, ज्यामुळे ते अंधारात सहज पाहू शकतात.

अजगर हा सरपटणाऱ्यास प्राण्यांमधील महाकाय शिकारी. एकदा शिकार केली की अनेक महिने याला खाण्याची गरज लागत नाही, अजगर ही दिवसातून १८ तास झोपून काढते

Opossum ऑपस्म नावाचा दक्षिण अमेरिकेत आढळणारा प्राणीही झोपण्याच्या बाबातीत पुढे आहे तो दिवसातील १८ तास झोपून काढतो. हा उत्तर आणि एक निशाचर (रात्री फिरणारा) सस्तन प्राणी आहे. कांगारूंप्रमाणेच याच्या पोटाला पिशवी असते,

Brown Bat त्‍यांनतर दिवसभर झाडावर लटकलेले उत्तर अमेरिकेत आढळणारे ब्राऊन बॅट या जातीचे वटवाघूळ हे दिवसातील १९ ते २० तास झोपून काढते, हे प्रामुख्याने किटक खाते

Koala ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा एक अतिशय गोंडस प्राणी हा जगात सर्वाधिक काळ झोपणारा व आळशी प्राणी म्हणून ओळखला जातो. हा कोआला प्राणी २०- २२ तास दिवसातून झोपून काढतो.