पुढारी वृत्तसेवा
शांत आणि गाढ झोपेसाठी खोलीचे वातावरण अनुकूल असणे खूप गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, खोलीत जेवढ थंड वातावरण आणि अंधार असेल, तितकी झोप उत्तम येते.
रात्रीच्या वेळी खोलीत पूर्ण अंधार असणे गरजेचे आहे, कारण अंधारामुळे शरीरात 'मेलाटोनिन' हे झोपेसाठी आवश्यक असणारे हार्मोन तयार होते.
जर तुम्ही दार उघडे ठेवले, तर बाहेरचा प्रकाश खोलीत येऊन तुमच्या झोपेत व्यत्यय आणू शकतो. त्यामुळे दार बंद करून झोपणे हाच उत्तम पर्याय आहे.
मुलांच्या बेडरूमचे दार बंद ठेवल्याने बाहेरचा आवाज आत येत नाही आणि मुलांना शांत झोप लागते.
जर तुम्ही लहान मुलांना स्वतंत्र झोपण्याची सवय लावत असाल, तर दार बंद ठेवा आणि घरातील तुमची रोजची कामे नेहमीप्रमाणे सुरू ठेवा. यामुळे लहान मुलांना घरातील सामान्य आवाजांची सवय होते.
रात्रीच्या वेळी पाळीव प्राणी (कुत्रा/मांजर) वारंवार आत-बाहेर करतात, ज्यामुळे तुमची झोप मोड होऊ शकते.
बेडरूमचे दार बंद ठेवल्याने पाळीव प्राणी अचानक आत येऊ शकत नाहीत. म्हणूनच, तज्ज्ञांच्या मते पाळीव प्राण्यांना बेडरूमच्या दाराबाहेरच झोपवणे योग्य ठरते.
शांत झोप, प्रकाश-आवाजापासून बचाव आणि सुरक्षेसाठी रात्री खोलीचे दार बंद करून झोपणे फायदेशीर आहे.