Namdev Gharal
दिवाळी सुरु झाली आहे, भारतभर रोषणाईबरोबर फटाक्यांचीही आतिषबाजी सुरु होईल, पण पूर्ण भारतात फटाके पोहचतता ते म्हणजे भारताची फटाका राजधानी म्हणजे तामिळनाडूतील एक गाव शिवकाशी
या गावाचे टोपननाव 'कुट्टी जपान' असे आहे कारण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शिवकाशीच्या लोकांची मेहनत आणि उद्योजकता पाहून या शहराला 'कुट्टी जपान' (छोटा जपान) अशी पदवी दिली होती.
हे शहर केवळ फटाकेच नाही, तर देशातील मोठ्या प्रमाणावर मॅचबॉक्स (काडेपेटी) आणि कॅलेंडर/ऑफसेट छपाईसाठीही प्रसिद्ध आहे.
१९२० च्या दशकात दुष्काळामुळे शिवकाशीची आर्थिक स्थिती बिकट होती. पण पी. अय्या नाडर आणि ए. षण्मुगा नाडर हे दोन चुलत भावांनी १९२२ मध्ये शिवकाशीत पहिली मॅच फॅक्टरी सुरू केली.
काडेपेटी ते रंगीबेरंगी फटाके (१९४०) : काडेपेटी बनवताना वापरल्या जाणाऱ्या रसायनांचे (सल्फर, पोटॅशियम क्लोरेट) ज्ञान असल्याने त्यांनी फटाके बनवण्याचा प्रयोग सुरू केला.
आज शिवकाशीत १,००० हून अधिक नोंदणीकृत फटाका कारखाने आहेत. या उद्योगाची वार्षिक उलाढाल ६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि थेट-अप्रत्यक्षपणे सुमारे ८ लाख लोकांना रोजगार मिळतो.
भारतातील एकूण फटाका उत्पादनापैकी एकट्या शिवकाशीमध्ये सुमारे ७०% ते ९०% फटाके तयार होतात. देशातील अधिकृत आणि ब्रँडेड फटाक्यांच्या बाजारपेठेत शिवकाशीचा हा वाटा निर्विवादपणे सर्वात मोठा आहे.
वर्षातील जवळपास ३०० दिवस दिवस-रात्र फटाके बनवण्याचे काम चालते. वर्षभर बनवलेल्या या हजारो टन फटाक्यांपैकी सुमारे ७०% फटाके हे दिवाळीच्या अवघ्या ४ ते ५ तासांत फोडले जातात
फटाक्यांच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या ऑफसेट प्रिंटिंगमुळे शिवकाशीत इतक्या अत्याधुनिक मशीन्स आल्या की जर्मनीच्या गुटेनबर्ग शहरानंतर जगात सर्वाधिक ऑफसेट प्रिंटिंग युनिट्स शिवकाशीमध्ये आहेत.
काडेपेटी, फटाका, व ऑफसेट प्रिंटीग अशा तिन्ही उद्योगांनी या शहराची भरभराट केली आहे. यामुळे 'शून्य टक्के बेरोजगारी' असलेले हे शहर आहे. १९८० ते ९० च्या दशकात शिवकाशीने १००% रोजगार दर गाठला होता.