Sinusitis : सायनसच्या त्रासाने वैतागलाय, या सोप्या घरगुती उपायांनी मिळेल इन्स्टंट आराम!

Namdev Gharal

सायनस ( sinus) हा सर्दीचा अतिशय त्रासदायक प्रकार यामध्ये ॠुतूमान बदलले की होणारी सर्दी, वारंवार शिंका येणे, वाहते नाक, चेहऱ्यावर सूज, कपाळ दुखणे या लक्षणांचा समावेश असतो.

सायनसचा त्रास कमी करण्यासाठी आणि नाक मोकळे करण्यासाठी तुम्ही खालील सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय करू शकता. हे उपाय सूज कमी करण्यास आणि साचलेला कफ बाहेर काढण्यास मदत करतात

गरम पाण्याचा शेक: एक स्वच्छ कपडा कोमट भिजवून घ्या. हा कोमट कपडा तुमचे नाक, डोळे आणि कपाळावर ३ ते ५ मिनिटे ठेवा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि वेदना कमी होतात.

गरम पाण्याची वाफ : एका मोठ्या भांड्यात पाणी उकळून घ्या. डोक्यावर टॉवेल ओढून त्या भांड्यातील पाण्याची वाफ ५ ते १० मिनिटे श्वासाद्वारे आत घ्या.

या वाफ घेणाऱ्या पाण्यात पुदिन्याचे तेल किंवा निलगिरी तेल व थोडासा ओवा टाकून वाफ घेतल्यास नाकातील सायनसचा दाब कमी होतो आणि शिंका येणे थांबते.

आले आणि तुळशीचा रस: एक चमचा आल्याचा रस आणि चमचाभर मध एकत्र करून दिवसातून दोनदा घेतल्यास नाकातील अंतर्गत सूज कमी होते आणि वारंवार येणाऱ्या शिंकांवर नियंत्रण येते.

हळदीचे कोमट पाणी किंवा दूध: हळदीमध्ये अँटी-अँलर्जिक गुणधर्म असतात. रात्री झोपताना हळद घातलेले दूध किंवा कोमट पाणी पिल्याने नाकाची इन्फेक्शनमुळे होणारी जळजळ आणि शिंका येणे थांबते.

गुळण्या करणे: कोमट पाण्यात थोडे मीठ आणि हळद टाकून दिवसातून दोनदा गुळण्या केल्यास घसा आणि नाकाचा मागील भाग साफ होतो, ज्यामुळे शिंका येणे कमी होते.

८-१० तुळशीची पाने, थोडे आले आणि काळी मिरी पाण्यात उकळून काढा तयार करा. त्यात थोडे मध टाकून कोमट असताना प्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि इन्फेक्शन कमी होते.

धूळ आणि थंड हवेपासून संरक्षण: सायनसचा त्रास असताना थंड पदार्थ खाणे-पिणे टाळावे आणि धूळ, प्रदूषण किंवा एसीच्या थेट थंड हवेपासून नाका-तोंडाचे रक्षण करण्यासाठी रुमाल वापरावा.

जर सायनसचा त्रास १० दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून असेल, ताप असेल, किंवा डोळ्यांभोवती सूज असेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.