पुढारी वृत्तसेवा
आजच्या काळात ‘हील्स’ घालणे हे केवळ फॅशन नसून एक ‘स्टाईल स्टेटमेंट’ बनले आहे.
पार्टी असो किंवा ऑफिस, स्टायलिश लूकसाठी महिला तासन्तास हाय हील्स परिधान करतात.
सतत आणि दीर्घकाळ हील्स वापरल्याने आरोग्यावर, विशेषतः गुडघ्यांवर अत्यंत वाईट परिणाम होऊ शकताे.
तज्ज्ञांच्या मते, रोज हील्स घातल्याने शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडते. यामुळे चालण्याची पद्धत बदलते आणि गुडघ्यांवर अतिरिक्त दाब पडतो.
हा दाब वाढल्यामुळे लिगामेंट आणि स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे गुडघेदुखी आणि सांधे आखडण्याच्या समस्या सुरू होतात.
सुरुवातीला केवळ हलकी वेदना किंवा ओढ जाणवते; सततच्या वापरामुळे गुडघ्यांच्या सांध्यातील ‘कार्टिलेज’ची (कूर्चा) झीज होऊ शकते.
ज्यामुळे भविष्यात ‘ऑस्टियो आर्थरायटिस’ (संधिवात) होण्याचा धोका वाढतो. हील्समुळे पायांचे स्नायू कमकुवत होतात.
टोकदार हील्समुळे पायांच्या नैसर्गिक हालचालींवर मर्यादा येतात, ज्याचा ताण थेट गुडघ्यांवर पडतो.