पुढारी वृत्तसेवा
कधीतरी साबणाने केस धुतल्यास मोठा फरक पडत नाही. पण, डॉक्टरांच्या मते, रोज साबण वापरल्यास केसांचे गंभीर नुकसान होऊ शकते.
साबणामुळे टाळूतील नैसर्गिक तेल निघून जाते. परिणामी केस कोरडे, खरखरीत आणि विस्कटलेले दिसतात.
साबणामुळे केसांचा बाह्य थर (क्युटिकल) उघडतो. त्यामुळे केस एकमेकांत अडकतात आणि विंचरताना पटकन तुटतात.
साबणामुळे टाळूची नैसर्गिक pH बिघडतो. यामुळे खाज सुटणे आणि कोंडा होण्याचा धोका वाढतो.
केसांचा मऊपणा आणि गुळगुळीतपणा गेल्यामुळे त्यांच्यावर प्रकाश परावर्तित होत नाही. परिणामी केसांची नैसर्गिक चमक कमी होते.
कलर्ड किंवा केमिकल ट्रीटमेंट केलेल्या केसांवर साबण वापरल्यास रंगद्रव्ये लवकर बाहेर पडतात आणि केसांचा रंग फिका पडतो.
टाळूच्या विशिष्ट आजारांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी किंवा बुरशीविरोधी साबण वापरणे योग्य ठरते; रोजच्या वापरासाठी नाही.