उन्हाळ्यात जेवल्यानंतर थंड पेये किंवा आईस्क्रीम खावे की नाही? खाल्यास होईल 'हा' परिणाम

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्याचा तडाखा आणि इच्छा

कडाक्याच्या उन्हात जेवण झाल्यावर काहीतरी थंडगार पिण्याची किंवा आईस्क्रीम खाण्याची तीव्र इच्छा होणे स्वाभाविक आहे.

ice cream birthplace

पचनसंस्थेवर होणारा परिणाम

आयुर्वेदानुसार, जेवल्यानंतर लगेच खूप थंड पदार्थ खाल्ल्याने पोटातील 'जठराग्नी' (पचनशक्ती) मंदावते.

canva photo

पचनक्रियेत अडथळा

थंड पेयांमुळे अन्नाचे पचन नीट होत नाही, ज्यामुळे गॅस, ॲसिडिटी किंवा पोट फुगल्यासारखे वाटू शकते.

Digestive power

रक्तवाहिन्यांचे आकुंचन

अचानक थंड पदार्थ शरीरात गेल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, याचा थेट परिणाम अन्नातून पोषक तत्वे शोषण्यावर होतो.

दातांच्या समस्या

गरम जेवण आणि त्यानंतर लगेच बर्फासारखे थंड पदार्थ खाल्ल्याने दातांच्या इनॅमलवर परिणाम होऊन सेन्सिटिव्हिटी वाढू शकते.

Teeth Brushing Technique | Canva

घसा दुखीचा धोका

उन्हाळ्यात शरीराचे तापमान जास्त असते; अशा वेळी अतिथंड पदार्थ खाल्ल्याने घसा खराब होणे किंवा सर्दी होण्याचा धोका असतो.

Sore Throat Remedies | file photo

तज्ज्ञांचा सल्ला

जेवण आणि थंड पेये किंवा आईस्क्रीम यामध्ये किमान ३० ते ४५ मिनिटांचे अंतर राखणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

pudhari photo

उत्तम पर्याय

जेवणानंतर लगेच आईस्क्रीम खाण्याऐवजी साध्या तापमानाचे पाणी किंवा ताजे ताक पिणे पचनासाठी केव्हाही उत्तम!

Drinking Water | Pudhari
येथे क्लिक करा...