व्हायरल रिल्स पाहून त्वचेवर लिंबू वापरताय? होऊ शकतात 'हे' गंभीर दुष्परिणाम

पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियावरील सर्वच स्किनकेअर हॅक्स सुरक्षित नसतात, हे लक्षात घ्या.

लिंबू थेट त्वचेवर लावल्याने तीव्र जळजळ किंवा खाज येऊ शकते.

लिंबातील सायट्रिक ॲसिडमुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होऊन त्वचा कोरडी पडते.

यामुळे त्वचेवर रॅशेस किंवा लालसरपणा येण्याची शक्यता असते.

लिंबू लावल्यानंतर उन्हात गेल्यास 'फायटोफोटोडर्माटायटीस' सारखे गंभीर आजार होऊ शकतात.

यामुळे त्वचेचा नैसर्गिक pH स्तर बिघडतो.

संवेदनशील त्वचा असलेल्यांनी लिंबाचा वापर टाळणेच हिताचे आहे.

कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Dr.
येथे क्लिक करा...