Namdev Gharal
आफ्रिकेजवळच्या मादागास्कर या बेटावर वन्यजीव पूर्ण जगात नाहीत असे अनोखे असतात. आता येथील पक्षी असेच वेगळे आहेत
यामध्ये सिकल-बिल्ड व्हॅंगा sickle-billed Vanga हा त्याच्या अनोख्या चोचीमुळे ओळखला जातो
या पक्ष्याची चोच ही वक्राकार एखाद्या कोयत्यासारखी किंवा विळ्यासारखी (sickle) असते. यावरुनचा याला हे sickle-billed vanga वेगा हे नाव पडले आहे.
त्याची वाकडी चोच इतर कोणत्याही पक्ष्यांपेक्षा वेगळी आणि अतिशय प्रभावी असते — म्हणूनच तो “मादागास्करचा कोयता-पक्षी” म्हणूनही ओळखला जातो.
हे पक्षी झाडांच्या उंच फांद्यांवर घरटी बांधतात., मादी साधारणतः २ ते ४ अंडी घालते., दोन्ही पालक पिल्लांची काळजी घेतात.
हा पक्षी अनेकदा गटाने फिरतो — साधारण ६ ते १२ पक्ष्यांचा थवा एकत्र दिसतो.- गटातील सदस्य एकमेकांना अन्न शोधण्यात मदत करतात, आणि एकत्र झोपतात.
प्रामुख्याने कीटक, अळी, झाडांवरील कीटकांची अंडी, आणि कधी कधी लहान सरडे खातो. याच्या चोचीमुळे अन्न किटक पकडण्यास याला चांगली मदत होते.
वाकड्या चोचीमुळे तो झाडाच्या सालाखालून किंवा फटीतून कीटक सहजपणे बाहेर काढू शकतो.
हा पक्षी दिसायलाही सुंदर असून याचे शरीर प्रामुख्याने पांढरे, पंख आणि शेपूट काळ्या रंगाचे असते