पुढारी वृत्तसेवा
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या परदेशात आहे. तिने आपला मुलगा रेयांशसोबत तिथेच ख्रिसमस साजरा केला.
आता असे दिसते आहे की, ती नवीन वर्ष देखील मुंबईबाहेरच साजरे करणार आहे.
तिने सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत, जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.
४५ वर्षांच्या श्वेताला पाहून चाहते तिला 'संतूर मम्मी' म्हणत आहेत.
श्वेता तिवारीने इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये 'क्लिक' असे लिहिले आहे.
श्वेताच्या या पोस्टला हजारो लोकांनी लाईक केले असून एका युजरने म्हटले, "तू खूप सुंदर दिसत आहेस," तर दुसऱ्याने म्हटले, "संतूर मम्मी."
यापूर्वी श्वेताने एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती मुलगा रेयांश आणि मित्रांसोबत ख्रिसमसच्या सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत होती.
श्वेताची मुलगी पलक तिवारी देखील नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मुंबईहून रवाना झाली आहे.
तिला सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले होते.
मात्र, ती सुट्ट्यांसाठी गेली आहे की काही कामासाठी, याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.