Spleen|श्रेयस अय्यरला आयसीयुत भरती व्हावे लागले तो ‘प्लीहा’ काय काम करतो

Namdev Gharal

ऑस्ट्रेलियाबरोबर खेळताना श्रेयस अय्यर डाव्या बाजूला पडला आणि त्‍याच्या प्लिहाला दुखापत झाली त्‍याला थेट आयसीयुत भरती करावे लागले spleen |

अय्यरला दुखापत झाली तो बरगडीखालील अवयव म्हणजे Spleenमराठीत याला प्लिहा म्हणतात. याचे काय काम असते जाणून घेऊया

प्लीहा पोटाच्या वरच्या डाव्या भागात 8 ते 10 व्या बरगडीखाली आणि जठराच्या मागे असतो. 10–12 सें.मी. लांब व 150–200 ग्रॅम वजनाचा असतो

प्लीहा हा मऊ, लालसर जांभळ्या रंगाचा, फणसाच्या बियांसारखा किंवा राजमासारखा दिसणारा अवयव आहे.

रक्ताचा फिल्टर : याचे मुख्य काम रक्तातील जुन्या व खराब झालेल्या लाल रक्तपेशी (RBCs) नष्ट करतो. नवीन रक्तपेशींचे साठवण करतो म्हणजे एकप्रकारे रक्त फिल्टर करत असतो.

याठिकाणी पांढऱ्या रक्तपेशींची साठवणूक केलेली असते ज्यावेळी जखम होते त्‍यावेळी संक्रमणांविरुद्ध लढण्यात प्लिहा मदत करतो.

Immune सिस्टम: प्लीहा शरीरातील बॅक्टेरिया, व्हायरस व परजीवींचे अंश ओळखून त्यांच्यावर प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात मदत करतो.

प्लीहा रक्ताचा साठा ठेवतो, आणि जास्त रक्ताची गरज भासल्यास (उदा. जखम किंवा रक्तस्राव) ते रक्त शरीरात सोडतो.

अपघात किंवा धक्क्याने प्लीहाला दुखापत होते, ही एक आपत्कालीन स्थिती असते. श्रेयस अय्यरच्या बाबतीत हेच झाले.

हा अवयव जेवढा महत्‍वाचा असतो तितकाच नाजूकही असतो, हा रक्ताने भरलेला असतो, मऊ असतो त्‍यामुळे याला दूखापत झाली तर अंतर्गत रक्तस्त्राव खूप होतो

काही गंभीर स्थितींमध्ये प्लीहा काढला जातो. त्यानंतर व्यक्तीला कोणत्‍याही संसर्गाचा धोका वाढतो, त्यामुळे लसीकरण व काळजी आवश्यक असते.

Crab Migration : एकाचवेळी कोट्यवधी लाल खेकडे उतरतात रस्त्‍यावर