Fitness tips: फिटनेससाठी रिकाम्या पोटी व्यायाम करावा का?

पुढारी वृत्तसेवा

रिकाम्या पोटी व्यायाम करावा की नाही, हे पूर्णपणे तुमची फिटनेसची उद्दिष्टे, आरोग्याची स्थिती आणि व्यायामाची तीव्रता यांवर अवलंबून असते.

रिकाम्या पोटी व्यायाम करण्याला 'फास्टेड ट्रेनिंग' असेही म्हणतात आणि याचे काही फायदे व तोटे आहेत.

फायदा: कमी तीव्रतेच्या व्यायामादरम्यान (उदा. कार्डिओ) रिकाम्या पोटी व्यायाम केल्यास चरबी वेगाने जळण्यास मदत होऊ शकते.

तोटा: पूर्णपणे रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने अनेकदा जड व्यायामासाठी ताकद कमी पडू शकते, चक्कर येऊ शकते आणि स्नायूंचे नुकसान होऊ शकते.

त्यामुळे, जरी काही लोकांना रिकाम्या पोटी व्यायाम करणे फायदेशीर ठरत असले, तरी ही पद्धत प्रत्येकासाठी योग्य नाही. उत्तम परफॉर्मन्ससाठी व्यायामाच्या ३० ते ६० मिनिटे आधी हलका आहार घेणे सुरक्षित आणि फायदेशीर मानले जाते.

खाताना काय काळजी घ्याल?

  • कार्बोहायड्रेट्स: ऊर्जा मिळण्यासाठी कॉम्प्लेक्स कार्ब्स खा.

  • कमी फॅट्स आणि फायबर: पचनास जड असलेले पदार्थ टाळा.

  • प्रोटिन: स्नायूंच्या मजबुतीसाठी थोडे प्रोटीन घ्या.

व्यायामापूर्वी, दरम्यान आणि नंतर भरपूर पाणी प्या.

तुमच्या शरीराला काय मानवतेय याकडे लक्ष द्या.

व्यायामाआधी काय खावे?

  • केळे किंवा मूठभर ड्रायफ्रूट्स

  • ओट्स आणि प्रोटीन पावडर

  • अंडी आणि होल ग्रेन टोस्ट

  • भाजलेले मखाने

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.