पुढारी वृत्तसेवा
केळी खाण्याचे शरीला अनेक फायदे मिळतात. केळीच्या सेवनाने पोट भरलेलं राहतं.
केळी योग्य वेळी खाल्ली तर त्याचे आरोग्याला फायदे होतात.
केळीत पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बी 6 तसेच फायबरचे प्रमाण जास्त असते.
जेवल्यानंतर केळी खाल्याने याचे फायदे शरीराला मिळतात.
केळी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. खालेल्या अन्नाचे पचन नीट होते.
केळीच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रीत राहण्यास मदत होते.
मात्र यातील पोटॅशियममुळे काही लोकांना गॅस, अपचनाचाही त्रास होण्याचा संभव आहे.
केळी खाल्यानंतर एक तासभर पाणी पिउ नये. केळ पचायला जड असते. पाण्यामुळे गॅस, पोटदुखी, ॲसिडिटीची समस्या होउ शकते.