Shortness of breath |चालताना दम लागतो का? हे उपाय करुन बघा निश्चित फरक पडेल!

Namdev Gharal

बघा तुम्ही कधी चालताना स्वतःचे निरीक्षण केले आहे का? थोडे जरी चालले तरी दम लागतो हे आहे तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा संकेत आहे.

याचा अर्थ आहे की तुमचे हार्ट पंपींग कुठेतरी कमी पडत असल्याचे लक्षण असू शकते त्‍यामुळे चालताना दम लागू शकतो

किंवा लठठपणा, रक्ताअल्पता हे दोष सुद्धा तुमच्या शरिरात असू शकतात ही कारणे दम लागण्यासाठी असू शकतात

यासाठी पहिले काम करावे लागेल ते म्हणजे तुमचे कोलेस्ट्रोल लेव्हल चेक करुन घेणे

कोलेस्ट्रोल - यामध्ये LDL (बॅड कोलेस्ट्रॉल) हे १०० mg/dL पेक्षा कमी असावे याची धोकादायक पातळी ही १६० mg/dL आहे.

काय करता येईल - पहिला म्हणजे अळशीचा काढा किंवा जवसाचा काढा घेणे सुरु करा, यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसीड असते ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते

दुसरा प्रकार म्हणजे लसून आणि आल खिसून घ्यावे त्‍यामध्ये मध मिसळून खावे लसनामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते

रोज रात्री पोटऱ्यांना तेल लावा यामुळे रक्ताभिसरण चांगले होईल व पायांमध्ये ताकद येईल

लोहयुक्त आहार घ्यावा या लोहाचे पचन शरीरामध्ये योग्य होण्यासाठी व ते रक्तामध्ये मिसळण्यासाठी दही भात, ताकाचे सेवन करा

दही भात व ताक शरिरात जात असल्याने पचनक्रिया सुधारेल लठ्ठपणा कमी होईल, याचाही चांगला परिणाम दिसून येईल

हे काही घरगुती उपाय करुन बघा तुम्हाला हळू हळू फरक जाणवायला लागेल व चालताना लागणारा दमही कमी होईल.