Shire Horse | सर्वात बलाढ्य घोडा 'शायर हॉर्स'

Namdev Gharal

शायर हॉर्स ही जगातील सर्वात जुनी आणि ताकदवान घोड्यांची प्रजाती मानली जाते. हा मूळचा इंग्लंडमधील घोडा आहे

हा घोडा जगातील सर्वात उंच आणि वजनी घोड्यांची प्रजाती म्हणून ओळखली जाते.

इतिहासात 'सॅम्पसन' (Sampson) नावाचा शायर घोडा सर्वात उंच ठरला. याची उंची 7 फूट 2 इंच नोंदवली गेली आहे.

या घोड्यांची सरासरी उंची १७ ते १९ हँड्स (सुमारे ५.८ ते ६.३ फूट) असते. त्यांची शरीरयष्टी अतिशय भव्य आणि स्नायूदार असते.

एका पूर्ण वाढ झालेल्या शायर घोड्याचे वजन ८५० किलो ते १,१०० किलो पर्यंत असू शकते.

त्यांच्या पायांच्या खालच्या भागावर लांब, रेशमी केस असतात, ज्याला Feathering म्हणतात.

इतका अवाढव्य आकार असूनही हे घोडे अत्यंत शांत आणि प्रेमळ असतात. म्हणून त्यांना 'जेंटल जायंट्स' म्हणतात

जुना काळात यांचा वापर शेतीकामासाठी आणि जड ओझे वाहून नेण्यासाठी केला जायचा

आजही शोभेच्या स्पर्धा आणि ऐतिहासिक परेडमध्ये हे घोडे आकर्षण ठरतात