पुढारी वृत्तसेवा
भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
धवन फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आपली प्रेयसी सोफी शाईनसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
सोफी शाईन ही मूळची आयर्लंडची नागरिक आहे.
शिखर व सोफी यांनी मे 2025 मध्ये इन्स्टाग्रामवर आपल्या प्रेमसंबंधाची सार्वजनिकपणे कबुली दिली होती.
ताज्या वृत्तानुसार, हे जोडपे दिल्ली-एनसीआर परिसरात आयोजित शाही सोहळ्यात विवाहबद्ध होईल.
एका भव्य समारंभासाठी तयारी सुरू असून, क्रिकेट आणि बॉलीवूड क्षेत्रातील पाहुणे या सोहळ्याला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
सोफी शाईन ही आयर्लंडची प्रॉडक्ट कन्सल्टंट असून, अबुधाबी येथील ‘नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशन’मध्ये ती सेकंड व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत आहे.
या शाही विविहाची उत्सुकता चाहत्यांनाही लागली आहे.