Namdev Gharal
आपल्याकडे बहूतेक जणांच्या दिवसाची सुरवात शिरी उपीट्ट पोहे या नाश्ट्याने होते, पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या प्रकृतीनुसार व आजारानुसार कोणता नाश्ता योग्य ठरतो हे पाहू
मधुमेही रुग्ण : मधुमेहामध्ये रक्तातील साखर लगेच वाढणार नाही अशा पदार्थांची निवड करावी लागते उप्पीट यांच्यासाठी योग्य पण यामध्ये नेहमीच्या रव्या ऐवजी गव्हाच्या भरड्याचे किंवा ओट्सचे असावे.
शिरा मधुमेहामध्ये पूर्णपणे टाळावा. यात साखर आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असल्याने रक्तातील साखर खूप वेगाने वाढते. पोहे कार्बोहायड्रेट्सयुक्त असतात. डायबेटिस असल्यास साधे पोहे खाणे टाळावे किंवा अगदी कमी प्रमाणात खावे
ॲसिडिटी : ज्या लोकांना पित्ताचा तीव्र त्रास आहे आणि सकाळी उठल्यावर छातीत जळजळ किंवा आंबट पाणी येते, त्यांनी पोटाला थंडावा देणारा नाश्ता करावा.
मऊ शिरा: रव्याचा किंवा गव्हाचा मऊ शिरा, ज्यामध्ये साखरेऐवजी खडीसाखर वापरली असेल आणि तूप योग्य प्रमाणात असेल. तूप हे उत्तम पित्तशामक आहे.तसेच दुधातले पाहे खावे
तिखट उप्पीट किंवा कांदा पोहे: जास्त मिरची, मोहरी, कढीपत्ता आणि लिंबू टाकलेले पोहे किंवा उप्पीट खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास प्रचंड वाढू शकतो. त्यामुळे हे टाळावे
गॅस, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता असलेल्यांनी मऊ उप्पीट खावे : आल्याचा तुकडा आणि थोडे तूप घालून केलेले मऊ उप्पीट पचनाला चालना देते आणि गॅस कमी करते.
हे टाळा, पोहे: पोहे मुळात कोरडे (रूक्ष) असतात. ते खाल्ल्याने आतड्यांमधील कोरडेपणा वाढून बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास अधिक वाढू शकतो. तसेच शिराही या लोकांनी टाळावा.
लठ्ठपणा : वजन कमी करायचे असल्यास भाज्या घातलेले उप्पीट किंवा पोहे: कमी तेलात केलेले आणि भरपूर भाज्या टाकलेले उप्पीट किंवा पोहे खावेत. पोह्यांसोबत एखादे उकडलेले अंडे किंवा मोड आलेली मटकी घ्यावी
काय टाळावे?: तूप-साखरेचा शिरा: शिऱ्यामध्ये कॅलरीज आणि फॅट्स खूप जास्त असतात. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास शिरा खाणे पूर्णपणे बंद करावे.
ज्या लोकांना वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास होतो त्यांनी गरमागरम उप्पीट खावे, उप्पीट बनवताना त्यात आले, मिरी पावडर आणि कढीपत्ता जास्त घालावा. हे कफ वितळवण्यास मदत करते
शिरा आणि थंड पोहे: शिरा हा शरीरात कफ आणि जडपणा वाढवतो, तर थंड झालेले पोहे किंवा पोह्यांवर लिंबू पिळून खाल्ल्याने सर्दीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे हा नाश्ता त्यांनी टाळावा