Hair Health Tips | केसांच्या आरोग्यासाठी 'या' ७ बिया ठरतील फायदेशीर

पुढारी वृत्तसेवा

केसांच्या निरोगी वाढीसाठी अनेक प्रकारची महागडी तेल, औषधे घेतली जातात, पण याचा फायदा होईलच असे नाही

केसांच्या आरोग्यासाठी आपल्या स्वंयपाक घरातील बिया फायदेशीर ठरतात, याची माहिती आपल्याला नसते, तर जाणून घेऊया याबाबत

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, लोह (आयर्न) आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. हे पोषक घटक केसांच्या निरोगी वाढीसाठी मदत करतात

तिळामध्ये लोह, कॅल्शियम आणि आरोग्यदायी फॅट्स असतात. त्यामुळे टाळू आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात

जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि तंतुमय पदार्थ (फायबर) मुबलक असतात. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहारामध्ये समावेश केला जातो

चिया बिया त्यांच्या उच्च पोषणमूल्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅट्स असतात. या बिया पाणी सहज शोषून घेतात

सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, सेलेनियम आणि आरोग्यदायी फॅट्स असतात. या बिया केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात

टरबूजाच्या बियांमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम आणि लोह असते. भाजलेल्या टरबूजाच्या बिया आरोग्यदायी मानल्या जातात

मेथीच्या दाण्यांचा वापर स्वयंपाकाबरोबरच पारंपरिक केसांची निगा राखण्यासाठीही करता येतो. त्यामध्ये प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असतात

येथे क्लिक करा