Namdev Gharal
दक्षिण स्पेनमध्ये एक गाव आहे ज्याचे छत हे कोणतेही मानवनिर्मित नसून ते चक्क विशाल नैसर्गिक खडकांनी बनले आहेत
दक्षिण स्पेनमधील 'सेतेनिल दे लास बोदेगास' (Setenil de las Bodegas) असे या गावाचे नाव आहे
या गावातील गावात रस्ते महाकाय खडकांच्या आडोशाला आहेत आणि काही घरे थेट डोंगराच्या कपारीत बांधलेली आहेत.
दगड इथे छतासारखे काम करतात, ज्यामुळे हे ठिकाण फोटोमध्ये एखाद्या स्वप्नवत जगासारखे दिसते
याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथील 'लॉजिक'. निसर्गाला बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, हे गाव निसर्गाशी जुळवून घेऊन वसले आहे
येथील लोकांनी खडकाच्या नैसर्गिक आकाराचा वापर करून घरे बनवली आहेत
या गावाचे आधुनिक स्वरूप १२ व्या शतकात 'मुरीश' (Moorish) काळात विकसित झाले. त्यावेळी येथील नैसर्गिक खडकांचा वापर संरक्षणासाठी आणि किल्ल्यासाठी केला गेला
खडक छतासारखे काम करत असल्याने, घरांमध्ये नैसर्गिकरित्या थंड वातावरण असते.
रस्ते खडकांच्या खाली आहेत, तर काही घरे थेट डोंगराच्या कपारीतून कोरली आहेत.
ही घरे केवळ दिसायला सुंदर नाहीत, तर राहण्यासाठी अत्यंत सुरक्षित आणि सोयीस्कर आहे.
फोटोग्राफीसाठी हे एक 'ड्रीम डेस्टिनेशन' मानले जाते जगभरातील पर्यटक येथे भेट देत असतात