मोनिका क्षीरसागर
तीळ अत्यंत बहुगुणी असल्यामुळे परंपरेने वेगवेगळ्या स्वरूपात आणि प्रमाणात तिळाचा वापर होतो
शरीरक्रिया सुरळीत चालू राहाव्यात, संसर्ग / आजार/ रोगांपासून शरीराचं रक्षण व्हावं, यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक घटकांचा साठा तिळात असतो
हाडांच्या, दातांच्या, हिरड्यांच्या आणि केसांच्या मजबुतीसाठी तीळ वरदान मानले जातात.
पचन आणि जठराग्नी सुधारणं, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करणं, मूळव्याधीचा त्रास शरीराला होऊ न देणं यासाठी तीळ प्रभावी ठरतो.
तिळामध्ये आढळणारं सेसमिन हे अँटिऑक्सिडेंट आहे, कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास ते मदत करतं.
तिळाच्या बियांमध्ये भरपूर मॅग्नेशियम असतं. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास ते मदत करतं.
तीळ खाल्ल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहत असल्याचंही आढळून आलं आहे.
तणाव आणि नैराश्य दर ठेवण्यासाठी, कमी करण्यासाठी तिळामध्ये मुबलक प्रमाणात असलेली पोषकतत्त्वं प्रभावी ठरत असल्याचंही आढळून आलं आहे.