पुढारी वृत्तसेवा
हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चहाची चव आणि सुगंध घरात का येत नाही? याचे रहस्य दडलेले आहे खास मसाल्यांमध्ये! या सोप्या ट्रिकने बनवा परफेक्ट चहा मसाला.
साहित्य
हिरवी इलायची: २० ग्रॅम
सायीची/काळी मिरी: १० ग्रॅम
दालचिनी: १० ग्रॅम
सुंठ पावडर: १५ ग्रॅम
बडीशेप: ८ ग्रॅम
लवंग: ५ ग्रॅम
बडी इलायची: ३ ते ४ नग
जायफळ: १ छोटा तुकडा
जावित्री: १ चमचा
तुळशीची मंजरी व ताजी पाने: योग्य प्रमाण (ओलावा घालवण्यासाठी)
मसाला बनवण्याची पद्धत
दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि बडीशेप कमी आचेवर ३० सेकंद गरम करा. त्यात हिरवी व मोठी इलायची घालून काही सेकंद परतून बाजूला काढा.
पॅनमध्ये तुळशीची मंजरी व पाने हलकी भाजून घ्या जेणेकरून त्यातील ओलावा निघून जाईल.
सर्व मसाले पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. लक्षात ठेवा, जास्त बारीक पावडर करायची नाही!
कधी आणि कसा वापरावा मसाला?
तयार झालेला सुगंधित चहा मसाला एका स्वच्छ, कोरड्या आणि एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवा. महिनाभर चव कायम राहील.
चहा बनवण्याची पद्धत
पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात साखर, चहापत्ती आणि हा चहा मसाला घाला. नंतर आवश्यकतेनुसार दूध घालून खमंग चहा उकळून घ्या.