Selling feet photos: पायांचे फोटो विकून पैसे कमवताय? चुकूनही 'या' १० गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

पुढारी वृत्तसेवा

आजकाल ऑनलाइन जगतात पायांचे फोटो विकून पैसे कमवणे हा एक ट्रेंड जास्तच वाढला आहे. अनेकजण याला साइड बिझनेस म्हणून पाहत आहेत.

भारतात पायांचे फोटो विकण्यावर थेट बंदी घालणारा कोणताही विशिष्ट कायदा नाही. त्यामुळे सर्वसाधारणपणे हे कायदेशीर मानले जाते, पण त्यासाठी काही अटी आहेत.

कंटेंट तयार करणारी व्यक्ती सज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच फोटो स्वतःचेच असावेत.

भारतीय कायद्यानुसार, ऑनलाइन अश्लील किंवा आक्षेपार्ह मजकूर पसरवणे हा गुन्हा आहे. जर फोटोंचे स्वरूप अश्लील असेल, तर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

फोटो विकण्यासाठी भारतात विशेष प्लॅटफॉर्म नाही, परंतु अनेक लोक आंतरराष्ट्रीय वेबसाइट्स आणि सोशल मीडियाचा वापर करतात. अनेक क्रिएटर्स इन्स्टाग्रामवरून थेट ग्राहकांशी संपर्क साधतात.

यातून काही लोक महिन्याला ५ हजार पासून ते १ लाख रुपयांपर्यंत किंवा त्याहून अधिक कमाई करत असल्याचा दावा करतात.

हे सर्वस्वी तुमच्या कंटेंटची क्वालिटी आणि तुमचा प्रेक्षकवर्ग किती मोठा आहे यावर अवलंबून असते.

हे काम दिसायला सोपे असले तरी यात अनेक धोके आहेत. कारण, स्वतःची ओळख गुप्त ठेवणे कठीण जाऊ शकते. एकदा फोटो इंटरनेटवर गेले की ते कायमचे तिथेच राहतात.

प्लॅटफॉर्मच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास तुमचे अकाउंट कधीही बंद होऊ शकते, ज्यामुळे उत्पन्न अचानक थांबू शकते.

पैसे कमवणे चांगले आहे, पण स्वतःची डिजिटल सुरक्षा आणि कायद्याची चौकट मोडू नका. सावधगिरी बाळगूनच पुढचे पाऊल उचला!