Secret Archives व्हॅटिकन सिटीच्या 'अपाचे व्हॅटिकन ग्रंथालयात’ काय रहस्य लपवले आहे?

Namdev Gharal

ख्रिश्चन धर्मियांसाठी सर्वोच्च पवीत्र स्थानमध्ये व्हटिकन सिटी, इटलीतील रोममध्ये वसलेला हा सर्वात लहान देश आहे. याच्या ग्रथांलयामध्ये (पुराभिलेखागार) अनेक रहस्य लपवल्याचे मानले जाते

या पुराभिलेखागार म्हणजे व्हॅटिकन सिटीच्या 'अपाचे व्हॅटिकन सेक्रेट आर्काइव्ह्ज' (Vatican Apostolic Archive) बद्दल जगभरात कमालीचे कुतूहल आणि गूढ पसरले आहे.

८४ किलोमीटर लांब गुप्त कपाटे: या अभिलेखाालयात कागदपत्रे आणि पुस्तके ठेवण्यासाठी तब्बल ८४ किलोमीटर लांबीचे शेल्व्ह्स (कपाटं) आहेत. यामध्ये ८ व्या शतकापासून ते आजपर्यंतच्या ऐतिहासिक दस्तऐवजांचा अफाट साठा आहे.

येथे कोणत्याही सर्वसामान्य पर्यटकाला किंवा नागरिकाला प्रवेश मिळत नाही. केवळ उच्च स्तरावरील पात्र संशोधक, इतिहासकार आणि विद्वानांनाच प्रवेश मिळतो. यासाठी व्हॅटिकनच्या गुप्तहेर यंत्रणेसारख्या कठोर सुरक्षा पडताळणीतून जावे लागते.

प्रवेश मिळालेल्या संशोधकांनाही केवळ ठराविक कागदपत्रे पाहण्याची परवानगी असते. तेदेखील कागदपत्रे पूर्णपणे वाचू शकत नाहीत. काही कागदपत्रे आजही पूर्णपणे लॉक आणि गुप्त आहेत.

१४ व्या शतकात ख्रिश्चन योद्धा संस्था 'नाईट्स टेम्पलर'वर पोपने जादूटोणा, भ्रष्टाचार आणि देशद्रोहाचे आरोप करून त्यांना संपवले होते. या खटल्याची मूळ कागदपत्रे आणि खटल्याचे तपशील याच गुप्त तिजोरीत सुरक्षित ठेवले आहेत.

१६ व्या शतकात ख्रिश्चन धर्मात बंडखोरी करत 'प्रोटेस्टंट सुधारणावाद' सुरू करणारे मार्टिन ल्युथर किंग यांना पोप लिओ दहावा यांनी ख्रिश्चन धर्मातून बहिष्कृत केल्याचे मूळ अधिकृत कागदपत्र याच अभिलेखात पाहायला मिळते.

येथे फक्त युरोपच नव्हे, तर माया संस्कृती (Maya Civilization), अझ्टेक संस्कृती आणि अमेरिका खंड शोधल्याच्या काळातील दुर्मिळ कागदपत्रे आहेत

जगातील अनेक ऐतिहासिक सम्राट, राजे, महाराणी आणि राष्ट्रप्रमुखांनी पोप यांना लिहिलेली वैयक्तिक पत्रे येथे जतन केली आहेत. यात हेन्री आठवा याचा घटस्फोट आणि ब्रिटनच्या चर्चची स्थापना यांच्याशी संबंधित कागदपत्रांचाही समावेश आहे.

अनेक दशके जुनी "इन्फर्नो" (नरक) कपाटं: या इमारतीमध्ये एक अतिशय सुरक्षित आणि वेगळा भाग आहे, ज्याला अनधिकृतपणे 'इन्फर्नो' (नरक) सेक्शन म्हटले जाते.

यामध्ये चर्चच्या विरोधात गेलेली प्रकरणे, ब्लॅक मॅजिक, आणि अत्यंत वादग्रस्त खटल्यांचे रेकॉर्ड आहेत, जे आजही पूर्णपणे जगापासून लपवून ठेवण्यात आले आहेत.

हा भाग व्हॅटिकन सिटीच्या अंतर्गत अत्यंत सुरक्षित भूमीवर असून, येथे अण्वस्त्र-रोधक बंकरसारखी सुरक्षा आहे. कागदपत्रांचे तापमान आणि आर्द्रता नियंत्रित ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.